Chetan Bodke
नुकतंच मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ९ मार्च रोजी शनिवारी सोहळा पार पडला.
या सोहळ्यामध्ये झेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हाने मिस वर्ल्डचा मुकूट जिंकलाय.
मीडिया रिपोर्टनुसार, क्रिस्टिनाला जवळपास १० कोटी रुपयांचं बक्षीस स्वरूपात मानधन आणि वर्षभर जगभर मोफत राहण्यासाठी, खाण्यासाठी आणि प्रवासाची सुविधा मिळाली आहे.
या सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांसह हॉलिवूड सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती.
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी ११२ देशांतील स्पर्धकांमधून क्रिस्टीना पिजकोव्हाने मिस वर्ल्डचा मुकूट जिंकला.
क्रिस्टीना पिजकोव्हाचा जन्म १९ जानेवारी १९९९ चा असून ती एक झेक रिपब्लिकमधील प्रसिद्ध मॉडेलही आहे.
सध्या क्रिस्टिना लॉ अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत असून मॉडेलिंग क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत आहे. सोबतच ती एक सामाजिक कार्यकर्तीही आहे.
अलीकडेच तिने क्रिस्टीना पिजकोव्हा फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत क्रिस्टिना गरजूंना मदत करत असते.