Chetan Bodke
नुकतंच मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ९ मार्च रोजी शनिवारी सोहळा पार पडला.
या सोहळ्यामध्ये झेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हाने मिस वर्ल्डचा मुकूट जिंकलाय.
या स्पर्धेमध्ये भारताची सिनी शेट्टीही सामील झाली होती. पण सिनी मिस वर्ल्डच्या स्पर्धेत पराभूत झाली.
‘मिस वर्ल्ड २०२४’मधील भारताची प्रतिनिधी सिनी शेट्टी टॉप-४ शर्यतीतून बाहेर झाली.
सिनी मुळची कर्नाटकातली असून तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे. सिनीने २०२२ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब पटकावलाय.
भारतात मिस वर्ल्डचे आयोजन २८ वर्षांनंतर झाले. यापूर्वी १९९६ मध्ये भारतात ४६ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सिनीने फायनान्स अँड अकाऊंटमध्ये ग्रॅज्युएशन केले असून ती एक उत्तम क्लासिकल डान्सरही आहे.
सिनी एक सुप्रसिद्ध मॉडेल असून ती एक सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर आहे. तिचा इन्स्टाग्रामवर फार मोठा चाहतावर्ग आहे.