Manasvi Choudhary
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.
आज १८ ऑक्टोबर सर्वत्र दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी साजरा करतात.
धनत्रयोदशीला धनतेरस असे देखील म्हटंले जाते. धनत्रयोदशीला खरेदी करणं देखील शुभं मानलं जाते.
या दिवशी माता धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धनाची देवी लक्ष्मी, कुबेर व भगवान धन्वंतरी याची पूजा करतात.
हिंदू धर्मात भगवान धन्वंतरीला आरोग्य देणारा देव मानला जातो. धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य चांगले राहते.
पौराणिक कथेनुसार, भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनाच्यावेळी हातात अमृतकलश घेऊन प्रकट झाले होते.
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य लाभण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.