Manasvi Choudhary
दिवाळीचा फराळ म्हटलं की कुरकुरीत चकली डोळ्यासमोर येते. कुरकुरीत चकली घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
चकली बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, मूग डाळ, साबुदाणे, पोहे, जीरे, धणे हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम तांदूळ, डाळी हे सर्व स्वच्छ धुवून वाळवून द्यायचे आहे. हेच सर्व मिश्रण गॅसवर भाजून घ्या.
साबुदाणा देखील तुम्हाला चांगला खरपूस भाजायचा आहे. जिरे, धणे सुद्धा भाजून घ्या. भाजलेले सर्व मिश्रण एकत्रित करा आणि दळून घ्या.
दळलेलं चकलीचे पीठ चाळणीने चाळून घ्या. पीठ मळून घ्या. पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ, मसाला, तीळ, तेल आणि पाणी मिक्स करा.
चकलीच्या साच्याला आतून तेल लावा नंतर त्यात पीठाचा गोळा करून साच्यामध्ये घाला.
तेल लावलेल्या भाड्याने चकल्या गोलाकार पाडून घ्या नंतर गॅसवर कढईत गरम तेलामध्ये कुरकुरीत चकली तळून घ्या.