ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रणवीर अलाहाबादियाने युट्यूबपासून सुरुवात केली. तो एक युट्यूबर, पॅाडकास्टर आणि बिझनेसमॅन आहे.
रणवीरने नुकताच इंडियाज गॅाट लेटेंटच्या शोवर हजेरी लावली होती. यावेळी त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणवीरने २०१५मध्ये बीअर बायसेप्स नावाच्या युट्यूब चॅनला सुरुवात केली. यामध्ये तो फिटनेस, मोटिव्हेशन आणि सेल्फ इम्प्रुवमेंट म्हणजेच स्वतः मध्ये सकारात्मक बदल कसा आणायचा या संबधित व्हिडिओ शेअर करायचा.
दी रणवीर शो हा भारतातील लोकप्रिय पॅाडकास्टरपैकी एक आहे. पॅाडकास्टिंगच्या जगात रणवीर अलाहाबादिया कमी काळातच प्रसिद्धी मिळवली.
या शो मध्ये बिझनेस लीडर्स, फिल्म स्टार्स, इंटरनॅशनल सेलिब्रिटी आणि अध्यात्मिक गुरु यासारख्या मोठ्या व्यक्तींना बोलवले जाते. येथे त्यांचे मत जाणून घेतले जाते.
रणवीर केवळ एक युट्यूबर नाही तर तो मॅान्क एंटरटेनमेन्ट आणि लेव्हल सुपरमाइन्ड कंपनीचा को- फाउन्डर देखील आहे.
रणवीरचे इन्स्टाग्राम, लिंक्डइन आणि ट्विटर म्हणजेच एक्सवर लाखोच्या संख्येत फॅालोअर्स आहेत.
रणवीर अलाहाबादियाची एकूण संपत्ती कोटींमध्ये आहे. तो एक यशस्वी कन्टेन्ट क्रिएटर आणि बिझनेसमॅन आहे.