ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे पोटाशी संबधित अनेक समस्या उद्भवतात.
जर तुम्हालाही गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करुन या समस्येवर आराम मिळवू शकता.
ओव्याचे पाणी प्यायल्यास गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येवर आराम मिळतो.
गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास असल्यास जेवणात दहीचा समावेश करा.
गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास असल्यास जीऱ्याचे पाणी फायदेशीर ठरु शकते.
केळीचे सेवन अॅसिडिटीसाठी फायदेशीर आहे. तसेच पोटाशी संबधित अनेक समस्येवर केळी खाणं फायदेशीर ठरेल.
गॅस आणि अॅसिडिटीसह पोटाच्या अनेक समस्येवर आल्याचं सेवन फायदेशीर आहे.