Manasvi Choudhary
छत्रपती शिवाजी महाराज कोणाला आपले गुरू मानत होते? हे तुम्हाला माहितीये का?
इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योद्धे नव्हते तर, दूरदृष्टीचे नेते होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात 'गुरूंचे मार्गदर्शन' हे एका दीपस्तंभासारखे होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वतःच्या पराक्रमावर नव्हे, तर आपल्या गुरूंच्या शिकवणीतून मिळालेल्या विचार आणि नीतिमत्तेच्या जोरावर स्वराज्य उभे केले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात पहिले गुरू म्हणजे त्यांच्या माता राजमाता जिजाऊ. ज्यांच्यापासून महारांजाना बालपणाचे संस्कार व मार्गदर्शक होत राहिले.
स्वराज्यांच्या लढ्यासाठी प्रशासकीय व लष्करी शिक्षण तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगांचा वापर करून बलाढ्य शत्रूला कसे हरवायचे? याचे धडे दादोजी कोंडदेवांनी दिले. दादोजींनी शिवाजी महाराजांना घोडेस्वारी, तलवारबाजी, भालाफेक यांसारख्या युद्धकला आणि प्रशासकीय बाबींचे शिक्षण मिळाले.
स्वराज्यांच्या उभारणीसाठी शक्तीसोबत भक्तीची जोड असावी असा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरू म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी.