Manasvi Choudhary
'धुरंधर' चित्रपटातील शरारत या गाण्यामुळे आयेशा खान चर्चेत आहे. आयेशा खानने शरारत चित्रटात डान्स केला आहे. तिचं हे गाणं प्रचंड गाजले आहे.
आयेशा खानने हिंदी सिनेसृष्टीसह तेलुगु चित्रपटात अभिनय सादर केला आहे.
२००२ मध्ये जन्म झालेल्या आयेशा खानने अत्यंत कमी कालावधीत स्वत:च अनोख स्थान निर्माण केलं आहे.
नुकताच आयशा खानने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. आयशा खान म्हणाली की, सिनेइंडस्ट्रीत नेहमीच चांगले दिसण्याचा दबाव असतो.
अनेक वेळा तिच्यावर देखील लूक बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिच्या लूक्सबद्दल देखील अनेकांनी टोमणे मारले आहेत.
कधी तिला दात बदलण्यासाठी तर कधी नाक बदलण्यासाठी मागणी केली. मात्र आयेशा खानने स्वत:ची वेगळी ओळख कायम ठेवली.