Siddhi Hande
गोवा आणि कोकणी चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला आहे. अभिनेत्री वेदिका करकलने कोकणी चित्रपटसृष्टीत आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
वेदिकाने २०२२ मध्ये वयाच्या अवघ्या १८ वर्षी मिस गोवा किताब पटकावा होता.
वेदिकाने मॉडेलिंगचे काम केले आहे. अनेक साप्ताहिकांमध्ये तिचे फोटो लावण्यात आले होते.
२०२५ मध्ये वेदिकाने कन्नड चित्रपट जस्ट मॅरीडमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिचे सर्वत्र कौतुक झाले होते.
वेदिकाला खरी ओळख कोकणी चित्रपट आई साईबाबामधून मिळाली असं म्हणायला हरकत नाही.
आई साईबाबा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरीही यातून कोकणी आणि गोव्याच्या संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवले आहे.
वेदिकाने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. ती सध्या एमबीए करत आहे. शिक्षण आणि अभिनय अशा दोन्ही गोष्टी वेदिका उत्तम पद्धतीने सांभाळताना दिसत आहे.