Shruti Vilas Kadam
माधुरीने बनारस येथील 'PNG ज्युवेलर्स'च्या दालन उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. या प्रसंगासाठी तिने डीप पर्पल रंगाची सिल्की जरदोजी वर्क असलेली साडी परिधान केली होती.
साडीवरील गोल्ड जरी आणि जरदोजी वर्कमुळे साडी अधिक आकर्षक दिसते. फ्लोरल आणि पेसली डिझाइन्स लूकला ग्रेसफुल बनवतात.
साध्या पण स्टायलिश स्लीवलेस ब्लाउजमुळे पारंपरिक साडीला मॉडर्न ट्विस्ट मिळतो आणि साडीचा डिझाइन अधिक उठून दिसतो.
ओपन पदर ठेवून साडी व्यवस्थित नेसल्यास संपूर्ण लूक अधिक एलिगंट दिसतो.
लेयर्ड नेकलेस, इयररिंग्स आणि बांगड्यांसारखी डायमंड ज्वेलरी साडीला परफेक्ट कॉम्प्लिमेंट देते आणि लूक अधिक रिच बनवते.
सॉफ्ट मेकअपसोबत हलकी डार्क लिपस्टिक वापरल्यास लूक ओव्हरडन न वाटता आकर्षक दिसतो.
साइड पार्टिंग आणि हलके कर्ल्स असलेली हेअरस्टाइल चेहऱ्याला सुंदर फ्रेम देते आणि संपूर्ण लूक अधिक एलिगंट बनवते.
ही सुंदर सिल्क साडी प्रसिद्ध डिझायनर मृणालिनी राव यांच्या लेबलची असून तिची किंमत सुमारे 1,65,200 रुपये आहे. प्रीमियम सिल्क फॅब्रिकमुळे साडीला रिच आणि रॉयल लूक मिळतो, जो खास प्रसंगांसाठी परफेक्ट ठरतो.