Sakshi Sunil Jadhav
कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम कशी मिळवायची, जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी.
खातेदाराचं निधन झाल्यानंतर सर्वातआधई संबंधित बँकेला माहिती देऊन पैसे मिळवण्याची प्रोसेस सुरू करावी.
मृत व्यक्तीच्या खात्यात नॉमिनी नोंदवलेला असेल तर आवश्यक कागदपत्रे सादर करून दावा करता येतो.
बँकेत दावा करताना खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागते. बँक नॉमिनीचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रे तपासून पैसे देण्याची प्रक्रिया पूर्ण करते.
नॉमिनीला बँकेकडून पैसे मिळाले तरी त्या रकमेवरील अंतिम कायदेशीर हक्क वारसाहक्काच्या नियमांनुसार ठरू शकतो.
खात्यात नॉमिनी नोंदवलेला नसेल कर कायदेशीर वारसांना बँकेकडे दावा सादर करावा लागतो.
नॉमिनी नसेल तर बँक दावा अर्ज, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि कायदेशीर वारस असल्याचे पुरावे मागू शकते.
दाव्याची रक्कम आणि परिस्थितीनुसार बँक वारस प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा इतर कायदेशीर कागदपत्रे मागू शकते.
पैसे देण्याची प्रक्रिया बँकेचे नियम, खात्याचा प्रकार, नॉमिनीची नोंद आणि वारसाहक्कासंबंधी परिस्थिती यांवर अवलंबून असते. त्यामुळे संबंधित बँकेशी संपर्क साधून अधिकृत माहिती घ्यावी.