भारतात कोणाला मिळतो पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट?

Surabhi Jayashree Jagdish

विदेश प्रवास

विदेशात जाणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट जारी केले जातात.

किती प्रकारचे पासपोर्ट?

भारतामध्ये निळ्या, पांढऱ्या, केशरी आणि मरून रंगाचे पासपोर्ट दिले जातात. मरून पासपोर्टला डिप्लोमॅटिक पासपोर्ट असंही म्हटलं जातं.

रंगांचा अर्थ काय?

निळा पासपोर्ट सामान्य नागरिकांसाठी दिला जातो. तर केशरी पासपोर्ट अशा भारतीय नागरिकांना दिले जातात ज्यांनी दहावी नंतरचे शिक्षण पूर्ण केलेले नसतं.

पांढरा पासपोर्ट

हा पासपोर्ट भारतातील उच्च सरकारी अधिकाऱ्यांना दिला जातो. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना तो जारी केला जातो.

प्रक्रिया वेगळी

पांढरा पासपोर्ट मिळवण्याची अर्ज प्रक्रिया साध्या पासपोर्टपेक्षा वेगळी असते. याशिवाय, पांढऱ्या पासपोर्ट धारकांना काही विशेष अधिकार आणि सुविधा देखील मिळतात.

नियम काय आहेत?

आयएएस, आयपीएस अधिकारी तसंच इतर भारतीय सरकारी अधिकारी पांढऱ्या पासपोर्टसाठी पात्र ठरतात.

मरून पासपोर्ट

भारतीय विदेश सेवा (IFS) अधिकारी, परराष्ट्र मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकारी तसंच त्यांचे आश्रित जसे की पती/पत्नी, मुले आणि पालक यांना हा पासपोर्ट दिला जातो.

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

येथे क्लिक करा