Kalavantin Durg: शेकडो वर्षांपूर्वी कलावंतीण सुळक्यावर नेमकं कोण राहत होतं? इतिहासातील गूढ रहस्याचा उलगडा

Surabhi Jayashree Jagdish

सह्याद्रीतील सुळका

कलावंतीण दुर्ग रायगड जिल्ह्यात प्रबळगडाच्या शेजारी असलेला सुमारे २२५० फूट म्हणजेच ६८६ मीटर उंचीचा कातळ सुळका आहे. प्रबळगड आणि कलावंतीण यांना एका खिंडीने जोडलेलं आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणांचा इतिहास अनेकदा एकत्र सांगितला जातो.

Kalavantin Pinnacle | saam tv

कलावंतीणचा वापर

इतिहासातील उपलब्ध माहितीनुसार, कलावंतीण सुळक्याचा प्रमुख उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि टेहळणीच्या ठिकाणाप्रमाणे केला जात असावा. इतक्या उंच ठिकाणावरून आसपासच्या डोंगररांगा आणि मार्गांवर नजर ठेवणं शक्य होत असल्याने त्याला सामरिक महत्त्व मिळालं असण्याची शक्यता आहे.

Kalavantin Durg History | saam tv

इथे कोणाचा तळ असायचा?

कलावंतीणच्या माथ्यावर मोठ्या राजवाड्याचं किंवा शाही निवासस्थानाचे पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे येथे राजा किंवा शाही कुटुंब राहत होते, याचेही पुरावे नाहीत. उलट, टेहळणीचं काम लक्षात घेतल्यास याठिकाणी पहारेकरी किंवा सैनिकांची मर्यादित तुकडी तैनात असण्याची शक्यता आहे.

Kalavantin Durg Mystery | saam tv

गड किती जुना आहे?

काही स्थानिक कथांमध्ये या सुळक्याची निर्मिती १५व्या शतकातील कलावंती नावाच्या राणीशी जोडली जाते. त्यामुळे “५०० ते ६०० वर्षे जुना” हा अंदाज म्हणून मांडता येतो.

Kalavantin Fort Maharashtra | saam tv

कलावंती हे नाव कुठून आलं?

कलावंती नावामागे एका राणीची कथा प्रचलित आहे आणि काही ठिकाणी हा सुळका तिच्यासाठी बांधला गेला असल्याचं सांगितलं जातं. ही माहिती प्रामुख्याने स्थानिक आख्यायिका म्हणूनच नमूद केलीये. त्यामुळे कलावंती ही प्रत्यक्षात कोण होती, तिचे राज्य कुठे होते किंवा तिच्या नावावरच सुळक्याचे नामकरण झाले का, याचा संदर्भ इतिहासात फारसा नाही.

Prabalgad Fort | saam tv

शेकडो वर्षांपूर्वी इथे कोण राहत होतं?

उपलब्ध माहितीनुसार, कलावंतीणच्या परिसरात राजघराण्याचा कायमस्वरूपी निवास होता असे पुरावे नाहीत. उलट, टेहळणीसाठी नियुक्त पहारेकरी, सैनिक आणि किल्ल्याशी संबंधित अधिकारी किंवा किल्लेदारांची पथकं याठिकाणी कार्यरत असण्याची शक्यता दिसते. त्यामुळे कलावंतीणवर राहणारे लोक हे राजे-महाराजे नसून गडाच्या सुरक्षेशी संबंधित मनुष्यबळ असावं असा निष्कर्ष निघतो.

Maharashtra Trekking | saam tv

इतिहास आणि रहस्य

कलावंतीणच्या कातळात कोरलेल्या अरुंद पायऱ्या आणि उंच सुळका पाहिला की त्यामागे नेमका कोणता इतिहास दडला आहे, हा प्रश्न आजही निर्माण होतो. मात्र, राणी कलावंतीची कथा, सुळक्याची नेमकी निर्मिती आणि याठिकाणी तैनात असलेल्या लोकांविषयीची माहिती यातील काही भाग आख्यायिका तर काही भाग ऐतिहासिक परिस्थितीवर आधारित आहे.

Kalavantin Durg Trek | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil belly button | saam tv
येथे क्लिक करा