Ankush Dhavre
बालपणी तुम्ही एकदा तरी साप सिडीचा खेळ खेळला असेल.
हा खेळ केव्हा सुरु झाला? या खेळाचा शोध कोणी लावला? असे असंख्य प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील.
या खेळाचा उगम भारतात प्राचीन काळात झाला होता. त्यावेळी या खेळाला परमपद सोपनम् किंवा मोक्षपटम असे म्हटले जायचे.
या खेळाचा शोध १३ व्या शतकात संत झानेश्वर यांनी लावला होता, असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो.
या खेळात साप आणि सिड्या या चांगल्या आणि वाईट कर्मांचे प्रतीक मानले जायचे.
या खेळामुळे लहान मुलांना चांगलं वाईटचं शिक्षण दिलं जायचं.
ब्रिटीशांनी या खेळाला Snakes and Ladders असे नाव दिले.
आता हा खेळ Snakes and Ladders या नावानेच प्रसिद्ध आहे.