Manasvi Choudhary
शाळेत जाणारी मुलं असो किंवा कामाला जाणारी मोठी माणसे प्रत्येकाला रविवारी सुट्टी असते.
मात्र रविवारी सुट्टी का, व ती कोणी सुरू केली असा प्रश्न तुम्हालाही असेल.
रविवारच्या सुट्टीला मोठा इतिहास आहे.
भारतात रविवारी सुट्टी जाहीर सर्वप्रथम महाराष्ट्राचे कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली.
ब्रिटीशाच्या काळात कामगारांना आठवड्याचे सात दिवस काम करावे लागत होते.
ब्रिटीश शासक व त्यांचे कर्मचारी हे रविवारी सुट्टी घ्यायचे मात्र कामगारांना सुट्टी नसायची.
मात्र कामगार संघटना यांच्या एकजुटीने आवाज उठवून कामगारांना देखील एक दिवसाची सुट्टी द्यावी अशी विनंती केली.
तब्बल ७ वर्षे आंदोलन केल्यानंतर १० जून १८९० मध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस जाहीर करण्यात आला.