Dhanshri Shintre
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं एक ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर ओळखलं जाणारं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे पर्यटकांना कायम आकर्षित करतं.
१९११ मध्ये गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम सुरू झाले होते आणि तब्बल १३ वर्षांनंतर १९२४ मध्ये हे भव्य स्मारक पूर्णत्वास आले.
गेटवे ऑफ इंडिया हे २६ मीटर (८५ फूट) उंच असून, त्याची भव्य रचना मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उठून दिसणारी एक प्रमुख ओळख आहे.
गेटवे ऑफ इंडिया कोणी बांधले हे तुम्हाला माहिती आहे का?
ब्रिटिश सम्राट जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारतातील पहिल्या भेटीच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम करण्यात आले होते, हे स्मरण म्हणून उभारले गेले.
आता उत्सुकता अशी की, हे भव्य आणि प्रसिद्ध स्मारक गेटवे ऑफ इंडिया नेमकं कोणी बांधलं आणि त्यामागचा इतिहास काय आहे?
गेटवे ऑफ इंडिया या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली होती, ज्यांनी त्याला ऐतिहासिक आणि कलात्मक रूप दिलं.
मार्च १९११ मध्ये, मुंबईचे त्या काळचे गव्हर्नर सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाची पायाभरणी केली होती.