Dhanshri Shintre
भारतामधील एक खास गाव आहे जेथे बहुतांश लोक करोडपती आहेत, म्हणून त्याला 'करोडपतींचं गाव' म्हणतात.
खरं सांगायचं तर या गावाची एकूण लोकसंख्या 1250 हून अधिक असून प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे.
गावातील 305 कुटुंबांपैकी 80 करोडपती आहेत, तर 50 कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांहून अधिक आहे.
कधी उपासमार अनुभवलेलं हे गाव आज श्रीमंतीचं प्रतीक बनलंय; जाणून घ्या कोणतं गाव आणि यामागचं रहस्य.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे भारतातील सर्वात श्रीमंत गाव मानलं जातं, जेथे यशाची अनोखी कहाणी आहे.
खरं तर 1980 आणि 1990 च्या दशकात या गावाला प्रचंड दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
1990 मध्ये दुष्काळाशी लढा देण्यासाठी गावात संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली होती.