Dhanshri Shintre
जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी असून, येथे अंदाजे ८८२ लोकसंख्या आहे.
फ्रेंच रिव्हिएरावर असलेला मोनाको, त्याच्या भव्य कॅसिनोसाठी ओळखला जातो आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान देश आहे.
पॅसिफिक महासागरातील नौरू हे फॉस्फेट खाणकामासाठी प्रसिद्ध लहान बेट असून, ते जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जगातील चौथा सर्वात लहान देश तुवालू आहे, जो केवळ 26 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे.
इटलीच्या उत्तरेतील डोंगरावर वसलेले सॅन मारिनो हे जगातील प्राचीन प्रजासत्ताक आणि पाचव्या क्रमांकाचे लहान देश आहे.
ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडच्या मधोमध वसलेला लिकटेंस्टाईन हा आकाराने सहाव्या क्रमांकाचा सर्वात छोटा देश मानला जातो.
पॅसिफिक महासागरातील मार्शल आयलंड्स हे सातव्या क्रमांकाचे लहान राष्ट्र असून ते आपल्या पारंपरिक संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
कॅरिबियन समुद्रातील सेंट किट्स आणि नेव्हिस हे क्षेत्रफळानुसार जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात लहान स्वतंत्र राष्ट्र आहे.
मालदीव हा जगातील नववा सर्वात छोटा देश असून त्याच्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि लक्झरी रिसॉर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.
युरोपातील भूमध्य सागरात वसलेला माल्टा हा छोटा देश असून तो जगातील दहावा सर्वात लहान देश मानला जातो.