ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण अनेकदा पाहिले असेल की, नखांवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. परंतु यामागचे कारण काय, जाणून घ्या.
नखांवर पांढऱ्या रंगाचे चट्टे एक नाही तर अनेक कारणांमुळे होतात.
फंगल इन्फेक्शन, अॅलर्जी किंवा नखाला कोणत्याही प्रकार जखमेमुळे देखील हे चट्टे येऊ शकतात. किंवा पोषणच्या कमीमुळे देखील हे डाग येऊ शकतात.
शरीरात बी १२ व्हिटॅमिन, झिंक आणि कॅल्शियमच्या कमतरेमुळे नखांवर पांढरे चट्टे येतात.
यासाठी झिंक, कॅल्शियम आणि बी १२ ने भरपूर असलेले पदार्थ खा.
झिंकसाठी भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे आणि अंड्याचे सेवन करा.
कॅल्शियम आणि बी १२ साठी आहारात दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच चिकनचा समावेश करा.