Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, रंगाचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर विशेष परिणाम होत असतो. पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि शिक्षणाचे प्रतीक मानला जातो.
हिंदू धर्मानुसार, विद्येची देवता सरस्वती देवीचा पोशाख पांढरा आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महिला पांढरी साडी परिधान करतात.
पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट कोणत्याही रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकतात.
पांढऱ्या रंगाच्या साडीवर लाल, नेव्ही ब्ल्यू, काळा आणि सोनेरी रंगाचा ब्लाऊज अधिक उठून दिसतो. ब्रोकेड वर्क, सिक्विन आणि मणीकाम केलेले ब्लाऊज परिधान केल्यास तुमचा लूक स्टायलिश दिसेल.
पांढऱ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज रॉयल लूक देतो जो पारंपारिक लूक म्हणून देखील तुम्ही करू शकता.
खास लग्न समारंभासाठी तुम्ही सिल्क पांढरी साडीवर ब्रोकेड किंवा जरी वर्क केलेला ब्लाऊज निवडू शकता.