Manasvi Choudhary
भारतात एव्हीएशन इंडस्ट्रीत काम करणारे एअर होस्टेस आणि पायलट यांच्या जॉबला प्रचंड मागणी आहे.परंतू यांच्या कामाचे तास आणि नियम पाहता हे एक जबाबदारीचे काम आहे. कारण हजारो प्रवाशांना सुखरूप प्रवास घडवून आणण्याचे काम पायलटचे असते.
नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) या ड्युटीचे तासांना नियंत्रण करणारी सर्वोच्च संस्था आहे.
नुकतंच (DGCA)ने पायलटच्या कामाच्या वेळेमध्ये बदल केला आहे ज्यामध्ये उड्डाणाची वेळ, ग्राऊंड ड्युटी, तयारीचा वेळ याचा समावेश आहे.
पायलटवरील दबाव कमी करणे तसेच थकव्यामुळे होणाऱ्या चुका टाळणे हे यामागचे उद्देश आहे. (DGCA)प्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशन नियमांनुसार पायलटचे ड्यूटीचे तास निश्चित केले जातात.
वैमानिकांसाठी (DGCA)नियमानुसार एक पायलट दिवसातून १० ते १४ तास काम करू शकतो ते आठवड्यातून जास्तीत जास्त ६० तास आणि महिन्यातून १९० तास काम करू शकतात. एखादा वैमानिक सलग सात दिवस ड्यूटीवर असेल तर त्यांना ३६ तास विश्रांतीची परवानगी आहे.
नुकताच (DGCA)ने ३६ तासांचा कालावधी ४८ तासांपर्यंत वाढवला ज्यामुळे इंडिगोच्या अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली त्यानंतर (DGCA)ने आपला निर्णय मागे घेतला. यानुसार एअर होस्टेसच्या कामाच्या वेळेबाबत सर्वसामान्य प्रमाण दिवसाचे ८ ते १० तास आहे.