White Hair Remedies: पांढऱ्या केसांवर काय उपाय करायचा प्रश्न पडलाय? मग हे तेल आठवड्यातून २ वेळा वापरुन पाहा

Shruti Vilas Kadam

कढीपत्ता आणि नारळ तेल का फायदेशीर आहे?

कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन B आणि आयर्न असते, तर नारळ तेल केसांना खोलवर पोषण देते. हे मिश्रण केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवण्यास मदत करते.

Hair Care | Saam tv

केस अकाली पांढरे का होतात?

तणाव, पोषणाची कमतरता, हार्मोनल बदल, केमिकल प्रॉडक्ट्स आणि अनियमित जीवनशैलीमुळे केस लवकर पांढरे होतात.

Hair Care

कढीपत्ता-नारळ तेल कसं तयार करायचं?

१०–१५ ताजे कढीपत्त्याची पाने धुऊन घ्या. एका पातेल्यात १ वाटी नारळ तेल घालून त्यात कढीपत्ता टाका. पाने काळसर होईपर्यंत मंद आचेवर उकळवा आणि तेल थंड झाल्यावर गाळून घ्या.

Hair Care

हे तेल केसांना कसं लावायचं?

तेल थोडंसं कोमट करून टाळूवर आणि केसांच्या मुळांवर हलक्या हाताने मसाज करा. संपूर्ण केसांवर लावा, विशेषतः पांढरे केस असलेल्या भागावर.

Hair Care

तेल किती वेळ ठेवायचं?

हे तेल किमान १ तास किंवा शक्य असल्यास रात्रभर केसांवर ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

Hair Care

आठवड्यात किती वेळा वापर करावा?

आठवड्यात २–३ वेळा नियमित वापर केल्यास केस मजबूत होतात आणि अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते.

Hair care

जास्त परिणामासाठी अतिरिक्त टिप्स

तेल लावतानाच आहारात आवळा, तिळ, कढीपत्ता आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. ताण कमी ठेवा आणि केमिकल हेअर प्रॉडक्ट्स टाळा.

Hair care

Lipstick Shades: तुम्हीपण नेहमीच चुकीच्या रंगाची लिपस्टिक खरेदी करता? मग हा सोपा कोरियन ट्रेंड नक्की वापरून पाहा

lipstick
येथे क्लिक करा