Lipstick Shades: तुम्हीपण नेहमीच चुकीच्या रंगाची लिपस्टिक खरेदी करता? मग हा सोपा कोरियन ट्रेंड नक्की वापरून पाहा

Shruti Vilas Kadam

नॅचरल लिपस्टिक शेड निवडणे का अवघड वाटते?

बहुतेक वेळा आपण आपल्या स्किन टोन आणि ओठांच्या नैसर्गिक रंगाशी न जुळणारी लिपस्टिक निवडतो. त्यामुळे लिपस्टिक कृत्रिम दिसते आणि चुकीच्या शेडवर पैसे खर्च होतात. योग्य शेड ओळखण्यासाठी कोरियन ट्रिक उपयुक्त ठरते.

Lipstick Shades

कोरियन ब्यूटी व्लॉगरची स्मार्ट ट्रिक

एका कोरियन ब्यूटी व्लॉगरने इंस्टाग्रामवर एक सोपी आणि प्रभावी ट्रिक शेअर केली आहे. या ट्रिकमध्ये फक्त बोटाच्या टोकाचा वापर करून योग्य लिपस्टिक शेड निवडता येतो.

Lipstick

फिंगर टिप टेस्ट – शेड मॅच करण्याचा सोपा मार्ग

सर्वप्रथम हाताची पहिली बोटाचा टोक थोडा जोरात दाबा. त्यामुळे त्या भागात रक्तसंचय होतो आणि त्वचेचा नैसर्गिक गुलाबी रंग स्पष्टपणे दिसतो.

Lipstick | GOOGLE

बोटाच्या टिपच्या रंगावरून लिपस्टिक निवडा

बोटाच्या टोकावर दिसणारा डार्क पिंक किंवा नैसर्गिक शेड हा तुमच्या ओठांच्या नैसर्गिक रंगाशी साधर्म्य दाखवतो. त्याच रंगाच्या जवळचा लिपस्टिक शेड निवडल्यास तो अधिक नैसर्गिक दिसतो.

lipstick

स्किन टोन ओळखणे महत्त्वाचे

प्रत्येकाची त्वचा वार्म किंवा कूल टोनची असते. तुमचा स्किन टोन ओळखून त्यानुसार लिपस्टिक निवडल्यास चेहऱ्यावर सॉफ्ट आणि फ्रेश लुक येतो.

Lipstick Shades

शेडची परफेक्ट मॅचिंग मिळते

फिंगर टिप ट्रिक वापरून निवडलेला शेड तुमच्या त्वचेशी सहज जुळतो. त्यामुळे लिपस्टिक ओव्हरडन न दिसता नैसर्गिक आणि सुंदर भासते.

Lipstick Shades

पैसे वाया जाण्याची शक्यता कमी होते

या सोप्या पद्धतीने शेड निवडल्यास चुकीचा रंग घेण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येतो आणि योग्य लिपस्टिकवरच पैसे खर्च होतात.

lipstick | Saam Tv

Benefits Of Dark Chocolate: डार्क चॉकलेट खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे

Dark Chocolate Health Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा