Shruti Vilas Kadam
डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉइड्स आणि पॉलिफेनॉल्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून पेशींचे संरक्षण करतात.
मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
डार्क चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन आणि एंडॉर्फिन हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि मूड फ्रेश राहतो.
डार्क चॉकलेटमधील फ्लॅव्होनॉइड्स मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुधारतात, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात.
डार्क चॉकलेट त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देते आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवते.
योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने गोड पदार्थांची क्रेव्हिंग कमी होते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
डार्क चॉकलेटमधील घटक इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारण्यास मदत करतात. यामुळे टाइप-२ डायबेटीसचा धोका कमी होऊ शकतो.