Shruti Vilas Kadam
प्रजासत्ताक दिनासाठी साडी हा सर्वात सन्माननीय आणि उत्तम पर्याय आहे. साधी बॉर्डर किंवा तिरंगी काठ असलेली पांढरी साडी देशाभिमान अधोरेखित करते.
पुरुष आणि महिलांसाठी पांढरा कुर्ता-पायजमा हा क्लासिक लूक देतो. तिरंगी दुपट्टा किंवा बॅज लावून लूक अधिक आकर्षक करता येतो.
साधा पण एलिगंट लूक हवा असेल तर पांढरा अनारकली ड्रेस उत्तम पर्याय आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांसाठी हा ड्रेस शोभून दिसतो.
ऑफिस, शाळा किंवा कॉलेजसाठी पांढरी कुर्ती आणि लेगिंग्स हा आरामदायक व सुसंस्कृत पर्याय ठरतो. हलकी भरतकाम असलेली कुर्ती अधिक उठून दिसते.
तरुणांसाठी पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्स किंवा ट्राउझरचा कॉम्बिनेशन साधा पण स्मार्ट लूक देतो. तिरंगी अॅक्सेसरीज याला देशभक्तीची झलक देतात.
पांढऱ्या रंगाचा सॅलवार–सूट हा पारंपरिक आणि सौम्य लूक देणारा ड्रेस आहे. तिरंगी दुपट्टा लूकला खास बनवतो.
आधुनिक आणि एलिगंट लूकसाठी पांढरा गाऊन किंवा लाँग ड्रेस निवडू शकता. शाळा- कॉलेजच्या कार्यक्रमांसाठी हा ड्रेस योग्य ठरतो.