Shruti Vilas Kadam
शॅम्पू केसांमधील मळ व तेल काढून टाकतो, त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात. कंडिशनर केसांना आवश्यक ओलावा देऊन कोरडेपणा कमी करतो.
कंडिशनरमुळे केस मऊ, रेशमी आणि चमकदार होतात. त्यामुळे केस हाताळायला सोपे होतात.
शॅम्पूनंतर केस खडबडीत होतात. कंडिशनर लावल्याने केसांवर संरक्षणात्मक थर तयार होतो आणि केस गुंतत नाहीत.
कंडिशनरमुळे केस मजबूत होतात. त्यामुळे कंगवा करताना केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
कंडिशनरमध्ये असलेली पोषक द्रव्ये केसांना आवश्यक पोषण देतात आणि केस निरोगी ठेवतात.
फ्रिझी आणि उडणारे केस कंडिशनरमुळे नियंत्रणात येतात. त्यामुळे केस अधिक नीटस दिसतात.
ब्लो ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरणाऱ्यांसाठी कंडिशनर केसांना उष्णतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून काही प्रमाणात संरक्षण देतो.