Shruti Vilas Kadam
धुताना दुसऱ्या कपड्याचा रंग पांढऱ्या कपड्यावर चढला असेल, तर तो कपडा इतर कपड्यांपासून ताबडतोब वेगळा काढा.
एका बादलीत किंवा मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या. रंग लागल्यानंतर शक्य तितक्या लवकर कपड्यावर प्रक्रिया करणे अधिक योग्य ठरते.
कोमट पाण्यात ईनोचे पाकीट आणि लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कपडे भिजत ठेवा त्यानंतर ते कपडे घासा. यामुळे कपड्यावर चढलेला रंग हलका होण्यास मदत होऊ शकते.
या मिश्रणात थोडे डिटर्जंट पावडर घालून चांगले मिसळा. त्यानंतर रंग लागलेला पांढरा कपडा या द्रावणात पूर्णपणे भिजवा.
कपडा साधारण १ ते १.५ तास या मिश्रणात भिजत ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
ठरलेला वेळ झाल्यानंतर कपडा बाहेर काढून हलक्या हाताने धुवा. खूप जोरात घासू नका, कारण त्यामुळे कपड्याचे फायबर खराब होऊ शकतात.
पुढे अशी समस्या टाळण्यासाठी रंग सोडणारे कपडे वेगळे धुणे चांगले. नवीन रंगीत कपडे पहिल्या काही धुतांमध्ये विशेष काळजीपूर्वक धुवावेत.