Saam Tv
वेळ आणि पैसा आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कदाचित आज तुमच्या स्वभावामुळे या दोन्ही गोष्टी वाया जाण्याची शक्यता आहे. शत्रू त्रास देतील.
बुद्धी आणि अर्थ दोन्हीच्या दृष्टीने आपली रास चांगली आहे. या दोन्ही क्षेत्रात आज प्रगती होईल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
कामानिमित्त प्रवास घडणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रावर मोठ्यांची नजर राहील. त्यामधून बढतीचे योग आहेत.
नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द आणि चिकाटीने परिस्थितीवर मात कराल. भावनिकता जपत नातेही सांभाळाल. दिवस चांगला आहे.
अचानक धनलाभाची शक्यता आहे. कागदपत्रे व्यवहार चोख ठेवावेत. जुनी येणी असतील तर तीही आज वसूल होतील.
आरोग्याच्या तक्रारी राहणार नाहीत. ठरलेल्या कामांविषयी नवीन दिशा नवीन मार्ग सापडतील. दिवस प्रभावीपणे जाईल. महत्त्वाकांक्षा वाढेल.
आपल्या वस्तूंची काळजी घ्या. खर्च वाढतील मनस्ताप वाढतील. परदेशी जाण्याचे योग नक्की होतील. दिवस संमिश्र आहे.
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात दिवस आनंदी जाईल. जुन्या गोष्टींना उजाळा मिळेल. कामे व्यवस्थित पार पडतील.
कलाक्षेत्रातील लोकांना सुसंधी लाभतील. पैशाची निगडित असलेले निर्णय आज मार्गी लागतील. कामाचा आवाका वाढता राहणार आहे.
गुरुकृपा लाभेल. आपले अंदाज अचूक ठरतील. शिव उपासना आज फलदायी ठरेल. भाग्यकारक घटना घडतील.
दैनंदिन कामे रखडतील. ती शक्यतो दुपारनंतर करावीत. महत्त्वाची कामे आज नकोतच. शारीरिक कष्ट पेलवतील एवढेच करा.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभल्यामुळे नवे चैतन्य निर्माण होईल. तुमची ऊर्जा वाढती राहील. आणि इतरांवर तुमचा प्रभाव चांगला असेल.