Chetan Bodke
योगा केल्यामुळे आपण भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत समाधानी आयुष्य जगू शकता.
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणतणावामुळे सर्वांनाच कशाचे ना कशाचे ओझे आहेत.
तणावातून बाहेर पडायचा एकच उत्तम मार्ग म्हणजे योगा.
योगा केल्यामुळे सदृढ आरोग्य राहते. कामाचं डिप्रेशन जास्त असल्यास शवासन करावे. त्यामुळे शरीराला आराम मिळेल.
बालासन केल्यामुळे शरीराला आराम मिळतो. १ ते ३ मिनिट हे आसान केल्यामुळे डिप्रेशन कमी होते.
वृक्षासन केल्यामुळे तुमचे मन शांत राहिल. या आसनामुळे शरीर लवचित होते.
पद्मासन केल्याने शरीर सदृढ आरोग्य राहते. गुडघे मजबूत ठेवण्यासाठी देखील हे आसन महत्वाचे आहे.
शरीराला आजारांपासून मुक्त ठेवण्यासाठी मार्जरी आसन महत्वाचा आहे. दररोज हा आसन केल्यामुळे तुम्हाला मणक्यासंबंधित आजार दूर होतील.
संबंधित लेख फक्त माहितीसाठी आहे.