Chetan Bodke
आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांच्या विचारात असतो. पण हेच विचार कधी कधी आपल्याला आनंदी राहून देत नाही.
सतत विचारात राहिलो तर, आपण केव्हाही समाधानी किंवा आनंदी राहू शकत नाही. जर आनंदी राहायचं असेल तर सकारात्मक विचार करा.
अनेकांना स्वत:वर विश्वास नसतो. प्रत्येक गोष्टींसाठी दुसऱ्यांना विचारत असाल तर वेळीच ही चूक सुधारा.
नकारात्मक गोष्टींच्या विचारात राहू नका. याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचारात राहा.
एकटं राहण्याची जर सवय असेल तर नैराश्य यायला लागतं. त्यामुळे कायमच पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहा.
भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करत बसू नका. त्यामुळे वर्तमानातल्या गोष्टी बिघडण्याची शक्यता आहे.
कधीच इतरांशी तुलना करू नये. असे केल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि तणाव वाढतो.
आपण समोरच्या व्यक्तीला जास्त वेळ दिला तर, आपली किंमत कमी होते. आधी स्वत:ला वेळ द्या आणि मग इतर लोकंही वेळ देतील.
प्रत्येक गोष्टीत जास्त विचार करण्यात गुंतून राहू नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करा.