Chetan Bodke
हिवाळ्यामध्ये बदाम आरोग्यासाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात.
हिवाळ्यात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतो. बदाममध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हिवाळ्यात बदाम खाणे फायदेशीर ठरते.
बदामामध्ये अनसेचुरेटेड फॅट्स आढळतात, जे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. बदाम हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
बदामामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यासोबतच पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासही मदत होते.
बदाममध्ये फायबर असते, ज्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढत नाही आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
बदामामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशींना होणारे नुकसान टाळता येते.
बदामामध्ये 'व्हिटॅमिन ई' आढळते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बदामामधील 'व्हिटॅमिन ई' त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या, त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.
बदामामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात.