कोणत्या भाज्यांमध्ये लसूण वापरू नये?

Surabhi Jayashree Jagdish

लसूण

काही भाज्या अशा असतात ज्यांच्यात लसूण टाकल्याने त्यांची मूळ चव, सुगंध आणि नैसर्गिक सौम्यता बिघडते. लसणाचा तिखट आणि तीव्र स्वाद काही वेळा विशिष्ट भाज्यांच्या नैसर्गिक गोडव्याला नाहीसा करतो.

लसूण वापरू नये

काही भाज्यांमध्ये लसूण टाळला, तर भाजीची नैसर्गिक चव अधिक चांगली लागते. अशा कोणत्या भाज्या आहेत ते पाहूयात.

दुधी भोपळा

दुधी भोपळा चवीने अतिशय सौम्य आणि हलकी भाजी आहे. त्यात लसूण टाकल्याने त्याची मूळ गोडसर चव हरवते.

लाल भोपळा

लाल भोपळ्यात नैसर्गिक गोडवा असतो, जो लसणाच्या तिखटपणामुळे कमी होतो. लसूण घातल्यास भाजीची चव बिघडू शकते. हिंग, मोहरी, आणि थोडं गुळ घातल्यास ही भाजी अप्रतिम लागते.

दुधी-तुरीच्या शेंगा

या शेंगांची चव सौम्य असते आणि त्यात लसूण टाकल्याने त्यातील नैसर्गिक चव नष्ट होते. लसणाच्या जडपणामुळे भाजी पचायलाही अवघड होते. त्यामुळे ही भाजी हलक्या फोडणीतच बनवावी.

गवार

गवाराची चव थोडी कडू आणि नाजूक असते ज्यावर लसूणाची चव जास्त होऊ शकते. त्यामुळे गवारची पारंपरिक चव हरवते. गवार हिंग आणि मोहरीच्या हलक्या फोडणीत उत्तम लागते.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगेचा गंध आणि पौष्टिकता लसणाच्या तिखट चवीने झाकला. ही भाजी सौम्य चवीची असल्याने लसूण तिचा तोल बिघडवतो.

कारलं

कारल्याची कडू चव लसणाने आणखी कडू होण्याची शक्यता असते. लसूण घातल्याने कारल्याचा स्वाद कडवटपणासह विचित्र होऊ शकतो.

Skin care: थंडीमध्ये हात काळे होतायत? या सोप्या टीप्सने त्वचा होईल सॉफ्ट आणि उजळ

येथे क्लिक करा