कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Surabhi Jayashree Jagdish

टॉमेटोची प्युरी

स्वयंपाकात टॉमेटोची प्युरी चव वाढवते पण काही भाज्यांमध्ये ती घातली तर भाजी बेचव, आंबट लागते. खास करून ज्या भाज्यांची नैसर्गिक गोडसर, कडू किंवा सुगंधी चव असते, तिथे टॉमेटोची प्युरी योग्य ठरत नाही.

कारले

कारल्याची कडू चव हीच त्याची ओळख आहे. टॉमेटो प्युरी घातल्यावर कडूपणा विचित्र आंबट-कडू होतो. यामुळे भाजीची मूळ चव पूर्णपणे बिघडते.

दुधी भोपळा

दुधी भोपळ्याची चव हलकी आणि गोडसर असते. टॉमेटो प्युरी घातल्यास ती चव दाबली जाते. भाजी पातळ आणि बेचव लागते.

दोडका

दोडक्याची भाजी साधी आणि सौम्य मसाल्यांत चांगली लागते. टॉमेटो प्युरीमुळे पाणी सुटून चव फिकी होते. भाजीला आवश्यक असलेला सुगंध राहत नाही.

भेंडी

भेंडी टॉमेटो प्युरीमुळे जास्त चिकट होते. आंबटपणा वाढल्यामुळे भेंडी नीट शिजत नाही. भाजीचं टेश्चर आणि चव दोन्ही खराब होतात.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगांना नैसर्गिक गोडसर चव असते. टॉमेटो प्युरी घातल्यावर ती चव झाकली जाते. भाजी अनावश्यक आंबट लागते.

गवार

गवार थोडी कडू चवीची भाजी आहे. टॉमेटो प्युरी तिच्या चवीशी जुळत नाही. भाजीला विचित्र आंबट-उग्र चव येते.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

येथे क्लिक करा