Surabhi Jayashree Jagdish
गरम मसाला हा भारतीय जेवणाचा महत्वाचा मसाला असला तरी सर्व भाज्यांमध्ये तो वापरला जात नाही. याचं कारण म्हणजे तो भाज्यांची नैसर्गिक, हलकी चव गरम मसाल्याने दबून जाते.
स्वयंपाकात गरम मसाला स्वाद वाढवण्यासाठी योग्य वेळ आणि भाज्यांची निवड महत्त्वाची आहे. आज आपण पाहूयात कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला टाळला पाहिजे. काही भाज्यांमध्ये त्याचा वापर टाळला जातो.
पालेभाज्यांचा स्वाद स्वतःचा हलका आणि नाजूक असतो. गरम मसाला घातल्यास तो मूळ चव दबावू शकतो. म्हणून पालक, मेथी सारख्या भाज्यांमध्ये गरम मसाला टाळावा.
कोबी
कोबी आणि फुलकोबीची चव सौम्य आणि हलकी असते. गरम मसाल्यामुळे ती चव बदलू शकते.
पडवळ किंवा दोडका यांची चव नाजूक आणि पाण्याची मात्रा जास्त असते. गरम मसाला घालल्यास सौम्यपणा हरवू शकतो. स्वाद आणि ताजेपणा कमी दिसू शकतो.
साधी वांग्याची भाजी बनवल्यास गरम मसाला आवश्यक नसतो. गरम मसाल्यामुळे वांग्याचा स्वाद कधीतरी कडू वाटू शकतो. त्याची नॅचरल चव निघून जाऊ शकते.
फरसबीची चव खूप हलकी आणि नाजूक असते. गरम मसाला ती स्वाद बदलू शकतो. त्यामुळे या भाजीत तो फारसा वापरला जात नाही.