Surabhi Jayashree Jagdish
भारतीय स्वयंपाकात लसूण हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो, जो अनेक पदार्थांना तीव्र चव आणि सुगंध देतो.
मात्र काही भाज्या अशा आहेत ज्यात लसणाचा वापर केला जात नाही किंवा तो टाळला जातो.
धार्मिक विधी, उपवास किंवा सणांच्या वेळी अनेक लोक 'सात्विक' भोजन करतात, ज्यात कांदा आणि लसूण पूर्णपणे वर्ज्य असतात.
बटाट्याची भाजी (उपवासाची), रताळ्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, राजगिरा पुऱ्या, भाजणीचे वडे. या भाज्यांमध्ये मिरची, जिरे आणि शेंगदाण्याचा कूट वापरला जातो.
काही पालेभाज्यांची स्वतःची एक नाजूक आणि विशिष्ट चव असते. लसूण ही चव बिघडू शकते. जसं की, तांदळाची भाजी, अंबाडीची भाजी.
वरण-भात किंवा साधं वरण करताना अनेक घरांमध्ये लसूण वापरला जात नाही, कारण डाळीची स्वतःची चव टिकवून ठेवायची असते.
ज्या भाज्यांची चव नैसर्गिकरित्या गोडसर असते किंवा ज्यांना खूप सौम्य चव अपेक्षित असते, तिथे लसणाचा तीव्र वास आणि चव योग्य वाटत नाही.