Foods to avoid with jaggery: कोणत्या भाज्यांमध्ये गूळ वापरू नये?

Surabhi Jayashree Jagdish

गूळ

स्वयंपाकात गूळ वापरल्याने चव संतुलित होते पण सर्वच भाज्यांमध्ये गूळ घालणं योग्य नसतं. काही भाज्यांची नैसर्गिक चव, पोत किंवा मसाल्यांचा तोल गुळामुळे बिघडू शकतो. विशेषतः झणझणीत, आंबट किंवा दुधावर आधारित भाज्यांमध्ये गूळ वापरल्यास भाजी बेचव होण्याची शक्यता असते.

दुधी भोपळ्याची भाजी

दुधी भोपळा स्वतःच गोडसर असतो. त्यात गूळ घातल्यास भाजी अतिशय गोड लागते. मसाल्यांची चव पूर्णपणे दबली जाते.

कोबीची भाजी

कोबीला शिजल्यावर हलकी गोड चव येते. गूळ घातल्यास उग्र वास आणि चव बदलते. भाजी बेचव होते.

फ्लॉवर

फुलकोबीला मसालेदार किंवा कोरडी भाजी शोभते. गूळ घातल्यास त्याची नैसर्गिक चव निघून जाते. झणझणीतपणा पूर्णपणे कमी होतो.

भेंडीची भाजी

भेंडी आधीच चिकट आणि नाजूक असते. गूळ घातल्याने भाजी अधिक चिकट होते. चव संतुलित राहत नाही.

वांगी-भाजी

वांग्याला मसाले, तिखट आणि आंबटपणा जास्त शोभतो. गूळ घातल्यास भाजी गोडसर होते. पारंपरिक चव बिघडते.

कडधान्याची झणझणीत भाजी

कडधान्यांची उसळ तिखट-आंबट असावी लागते. गूळ घातल्यास उसळीची धार कमी होते. खाण्याची मजा राहत नाही.

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

येथे क्लिक करा