Surabhi Jayashree Jagdish
कोथिंबीर सुगंधी आणि चवदार असली तरी काही भाज्यांमध्ये तिचा सुगंध मूळ चव बिघडवू शकतो. अशा भाज्यांची मूळ चव अतिशय नाजूक किंवा भारी मसाल्यांना सूट न देणारी असते.
काही भाज्यांमध्ये कोथिंबीर घातल्यास त्या डिशचा नैसर्गिक फ्लेवर बदलतो. कधी कधी कडूपणा येऊ शकतो. पाहूयात कोणत्या भाज्यांमध्ये कोथिंबीर घालू नये
कोथिंबीर घातल्याने मेथीचा नैसर्गिक कडवट–गोड फ्लेवर दबून जातो. मेथीची चव ताजी आणि वेगळी असते, ती कोथिंबिरीच्या सुगंधाशी जुळत नाही.
चवळीची चव सौम्य असते. कोथिंबीर घातल्यास तिचा सुगंध चवळीच्या नैसर्गिक चवीवर मात करतो. ती खरपूस किंवा साध्या मसाल्यातच चांगली लागते.
शेवग्याच्या शेंगांना हलका कडूपणा आणि वेगळी सुगंधी चव असते. कोथिंबीर टाकल्यास त्याचा फ्लेवर मिसळत नाही, आणि चव बिघडते. ही भाजी साध्या फोडणीत उत्तम लागते.
माठाची पाने स्वतः खूप सुगंधी आणि रुचकर असतात. कोथिंबीर घातल्यास दोन वेगवेगळे सुगंध एकत्र येऊन चव विचित्र होते. माठाची भाजी साध्या मसाल्यातच स्वादिष्ट लागते.
शेपूचा सुगंध खूप तीव्र असतो आणि कोथिंबिरीशी पूर्णपणे भांडतो. दोन्हींचे सुगंध एकत्रित झाले की भाजीची चव कधी कधी कडवट लागते.
कारल्याचा कडूपणा आणि कोथिंबिरीचा ताजेपणा एकमेकांना सूट करत नाही. कोथिंबीर टाकल्याने कारल्याची चव विचित्र बदलते.