Surabhi Jayashree Jagdish
कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकातील एक महत्त्वाचा घटक आहे.
पण काही भाज्या आणि पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर केल्यास त्यांची मूळ चव बिघडू शकते.
पालक पनीर, पालकाची भाजी किंवा पालक सूपमध्ये कढीपत्ता वापरल्यास पालकाची नैसर्गिक चव राहत नाही.
कोबीची भाजी बनवताना जिरे, मोहरी आणि हिंग वापरले जातात. कढीपत्ता वापरल्यास तो कोबीच्या सौम्य चवीवर परिणाम होऊ शकतो.
भेंडीची भाजी साधी आणि कुरकुरीत बनवल्यास अधिक चांगली लागते. कढीपत्त्याचा सुगंध या भाजीसाठी योग्य मानला जात नाही.
फ्लॉवर बटाटा किंवा इतर भाज्यांमध्ये कढीपत्ता वापरण्याची पद्धत नाही, कारण यामुळे चवीत फरक पडतो.
हिरव्या वाटाण्याची भाजी किंवा मटार करीमध्ये कढीपत्ता टाळला जातो, कारण वाटाण्याची गोड चव कढीपत्त्याच्या सुगंधाने दबली जाते.