Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
गरम पाण्याचे योग्य प्रकारे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात तसेच रोगांपासून संरक्षण मिळते.
रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शरिरात पाण्याचं प्रणाण संतुलित राहतं आणि शरिराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं.
अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ग्लास भरून गरम पाणी पितात मात्र, सकाळी गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी योग्य नाही.
रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शांत झोप लागते.
रात्रीच्यावेळेस शरिरातील मेटाबॉलिजम म्हणजेच अन्न पचनाची शक्ती मंदावते. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने अन्न व्यवस्थीत पचतं आणि पचन संस्थेवरही त्याचा चांगला प्रभाव पडतो.
रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने अपचन आणि ब्लोटिंगची समस्या निर्माण होवू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या