Saam Tv
उन्हाळा आला की शरीराला त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणात सुरू होतात.
उन्हामुळे त्वचा टॅन होते, काळवंडते, आपला रंग बदलतो.
तुम्ही अशा वेळेस काही पुढील फळाचा वापर करून तुमचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवू शकता.
फळे आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
फळांमध्ये त्वचेचा रंग उजळवण्यासाठी पपईचा वापर करू शकता.
पपईमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स असतात. जे चेहऱ्यावरून मृत पेशी काढून टाकतात.
पपईचा रस चेहऱ्याला लावल्यास त्वचा नैसगिर्क पद्धतीने शाइन करते.
चेहऱ्यावरील डाग मुरूम कमी करण्यासाठी तुम्ही रोज चेहऱ्याला पपई लावू शकता.
उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेशनची गरज असते. पपईचा रस त्वचेला ओलावा देण्याचे काम करते.