Surabhi Jayashree Jagdish
संक्रांतीच्या सणाला काळी साडी ही खास आकर्षण मानली जाते. काळ्या रंगावर मंगळसूत्राची रचना, मणी आणि सोन्याची झळक अधिक उठून दिसते. एक छान मंगळसूत्र निवडल्यास साडीचा लूक अधिक पारंपरिक आणि एलिगंट वाटतो.
मंगळसूत्र केवळ दागिना नसून तो सौभाग्याचं प्रतीक असल्यामुळे त्याची निवड करताना रंग, डिझाईन आणि लांबी यांचा समतोल महत्त्वाचा ठरतो. यंदाच्या वर्षी तुम्ही संक्रांतीला काळ्या साडीवर कोणत्या प्रकारचं मंगळसू्त्र घालू शकता ते पाहूयात.
काळ्या साडीवर क्लासिक मंगळसूत्र खूप उठून दिसतं. मणी आणि सोन्याची वाटी स्पष्टपणे दिसून येते. संक्रांतीसाठी हा डिझाईन सर्वाधिक पसंतीचा आहे.
मोत्यांची सौम्यता काळ्या साडीला उठून दिसतं. सोनं, काळे मणी आणि मोती यांचा सुंदर समतोल साधला जातो. हा डिझाईन पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही वाटतो.
संक्रांतीला लक्ष्मी नक्षी शुभ मानली जाते. काळ्या साडीवर सोन्याची कोरीव नक्षी उठून दिसते. सणासुदीला हा डिझाईन खास भावनिक अर्थ देतो.
दोन लेअरचं काळे मणी अधिक रॉयल लुक देतात. साध्या काळ्या साडीवर हे मंगळसूत्र लक्ष वेधून घेतं. पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
मंदिर कलेवर आधारित डिझाईन काळ्या साडीला भारीपणा देतो. जाड सोन्याची नक्षी विशेष आकर्षक दिसते. संक्रांतीसारख्या पारंपरिक सणाला हे फार शोभतं.
गळ्याजवळ बसणारं चोकर मंगळसूत्र काळ्या साडीवर उठून दिसतं. हलक्या दागिन्यांसोबत हा लुक खूप स्टायलिश वाटतो. आधुनिक साजेसा पण पारंपरिक भाव राखणारा पर्याय आहे.