ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साप हे जगातील सर्वात धोकादायक विषारी प्राण्यांपैकी एक आहेत.
काही साप इतके धोकादायक असतात की त्यांच्या विषामुळे काही सेकंदातच माणसाचा मृत्यू होतो.
पण तुम्हाला माहिती आहे का, साप किती काळ जगतो आणि कोणता साप सर्वात जास्त काळ जगतो? जाणून घ्या.
सापांच्या पिल्लांची वाढ वेगवेगळ्या प्रजातींवर अवलंबून असते. काही साप २ वर्षात तर काही ४ वर्षातच मोठे होतात. तसेच सापांचे वय त्यांचे आहार, जेनेटिक्स यासारख्या गोष्टींवर अवलंबून असते.
बहुतेक सापांच्या प्रजातींचे आयुष्य ८-१० वर्षे असते.
बोआ कॉन्स्ट्रिक्टर, म्हणजे मोठा अजगर, ही एक अशी प्रजाती आहे जी सर्वात जास्त काळ जगते. हे साप ४० वर्षांपर्यंत जगू शकतात.
भारतात आढळणाऱ्या विषारी कोब्राचे आयुष्य साधारणपणे २५-३० वर्षाच्या दरम्यान असते.