Sakshi Sunil Jadhav
वजन कमी करण्यासाठी आहारात काही बदल करावे लागतात. यासाठी भाता ऐवजी पोळी पोळी फायदेशीर असते. याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्याने वजन आणि रक्तातील साखर वाढते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या आणि डायबेटीज असणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.
नाचणीच्या भाकरीमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याने पचन सुधारतं, वजन कमी होतं.
जोवारी पोळी ग्लूटन-फ्री असून आयर्न आणि पोषक घटकांनी भरलेली आहे. ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
सेलेनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखी खनिजे जोवारी पोळीत असतात, त्यामुळे ती गव्हाच्या पोळीपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते.
प्रोटीन आणि फायबरने भरलेली सत्तू पोळी वजन कमी करण्यास मदत करते. ती रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे.
गव्हाच्या पोळीत फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ती कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.