Methi Usal Recipe: झणझणीत मेथी उसळ कशी बनवायची? वाचा गावरान रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

मेथीची उसळ

मेथीच्या दाण्यांची उसळ ही पौष्टिक, पचनास हलकी आणि रोजच्या जेवणात सहज समाविष्ट करता येणारी भाजी आहे.

Methi Usal Recipe

मेथीची उसळीचे फायदे

मोड आलेली मेथी पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवते.

Methi Usal Recipe

लागणारे मुख्य साहित्य

100 ग्रॅम मोड आलेली मेथी, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर इ.

Methi Usal Recipe

फोडणीसाठी साहित्य

तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता, चवीनुसार मीठ, एक चमचा तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, एक चमचा धनेपूड, हळद, गोडा मसाला इ.

Methi Usal Recipe

ऐच्छिक साहित्य

एक वाटी ओलं खोबरं, लिंबाचा रस आणि थोडा गूळ या साहित्यात गावरान स्टाईल भाजी तयार होईल.

Methi Usal Recipe

उसळ बनवण्याची सुरुवात

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.

Methi Usal Recipe

कांदा-टोमॅटो परता

कढईत कांदा गुलाबी होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून थोडे शिजू द्या.

Methi Usal Recipe

मेथी आणि मसाले घाला

मसाले घालून परतवा, त्यानंतर मोड आलेली मेथी, मीठ व गूळ घालून थोडे पाणी टाकून उसळ शिजवा.

Methi Usal Recipe

शेवटची टच आणि सर्व्हिंग

शिजल्यानंतर कोथिंबीर व लिंबाचा रस घालून गरमागरम मेथीची उसळ भाजी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

Methi Usal Recipe

NEXT: Saree Blouse Designs: कोणत्या साडीवर कोणता ब्लाउज दिसेल उठून? स्टायलिश लूकसाठी वाचा टिप्स

येथे क्लिक करा