Dhanshri Shintre
हिंदू धर्मानुसार हनुमानजी अमर आहेत आणि एका पूर्ण कल्पासाठी ते पृथ्वीवर आपल्या रूपात उपस्थित राहतील असे मानले जाते.
प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते आणि या दिवशी बजरंगबलीची भक्तीभावाने पूजा होते.
भगवान रामाचे भक्त हनुमानजी सूर्योदयाच्या वेळी जन्मले, अशी मान्यता आहे. हनुमान जयंतीला लवकर स्नान, पूजा, उपवास केल्यास दोष आणि आजार दूर होतात.
शनिदोष त्रासदायक असल्यास, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची पूजा केल्याने त्यातून मोठा दिलासा मिळतो, असं मानलं जातं.
आज आम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची पूजा कशी करावी आणि लागणारे साहित्य काय ते सांगणार आहोत.
पूजेसाठी लाकडी स्टँड, लाल-पिवळा कपडा, धूप, दिवा, तूप, सिंदूर, चंदन, अत्तर, फुले आणि प्रसाद आवश्यक असतो.
हनुमान जयंतीला स्नान करून उपवास ठेवा, पूजेसाठी लाकडी स्टँडवर लाल-पिवळा कपडा घालून मूर्ती किंवा चित्र ठेवा.
हनुमानजींच्या मूर्तीला स्नान घालून धूप-दिवा दाखवा, नंतर सिंदूर, चंदन, सुगंध, अत्तर यांची अर्पणा करून पूजा करा.
पंचोपचार पूजा पूर्ण झाल्यावर हनुमानजींना प्रसाद अर्पण करा आणि त्यानंतर भक्तीभावाने हनुमान चालिसाचे पठण करा.
हनुमान चालीसा पठण झाल्यावर बजरंगबलीची आरती करा आणि नंतर सर्व कुटुंबीयांना भक्तिभावाने प्रसाद वाटा.