Manasvi Choudhary
काकापो हा जगातील सर्वात मोठा पोपट मानला जातो. न्यूझीलंडमध्ये आढळणारा अवाढव्य शरीर असलेला हा पोपट पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
डोके आणि शरीर गोलाकार असणारा हा काकापो पोपटाचा चेहरा घुबडासारखा दिसतो.
काकापो जातीचा हा पोपट जगातील सर्वात जास्त काळ जगणारा पक्षी म्हणून देखील ओळखला जातो. काकापो हा पोपट ९० वर्षापर्यंत जगू शकतो अशी माहिती आहे.
काकापो हा पोपट उडू शकत नाही मात्र हा पोपट लांब अंतरापर्यंत चालू शकतात. काकापो हा पोपट झाडांचा सहज चढतात, उड्या मारतात मात्र धोक्याची जाणीव झाल्यावर जागीच स्थिर होतात.
नर काकापो पोपटाच्या पिसांना विशिष्ट गोड, वनस्पतीसारखा वास येतो. नर कोकोपाची लांबी २५ इंच पर्यंत वाढू शकते त्याचे वजन ४ किलोग्रँमपर्यंत असू शकते.
काकापो झाडांची फळे आणि बिया खातात झाडांच्या पानांमधील आणि खोडांमधील रस चोखण्यासाठी त्यांची चोच वापरतात.
नर काकापो विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी एक खोल, बासरीसारखा आवाज काढतो, ज्याला 'बूम' कॉल म्हणतात. हा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू येतो.