Manasvi Choudhary
सकाळी अभ्यास करण्याचे अनेक फायदे आहेत.
सकाळी सकाळी अभ्यास करण्याचा मोठा फायदा म्हणजे एकाग्रता वाढते. आपल्याला अवघड वाटणाऱ्या गोष्टींवर पुर्णपणे व्यत्यय न येता लक्ष देता येते.
शांतता- पहाटे पहाटे सर्वत्र शांत- निवांत वातावरण असते. घरातही कसलाच गोंधळ नसतो तसेच परिसरातही गाड्यांची जे- या नसते, त्यामुळे अभ्यास चांगला होतो.
सकाळी अभ्यास करताना मूड आणि मन एकदम फ्रेश असते. त्यामुळे विचार करण्याची समजून घेण्याची क्षमता वाढते. संपूर्ण लक्ष अभ्यासावर राहते.
सकाळी अभ्यास केल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. सकाळी केलेला चांगला अभ्यास लक्षात राहतो.
सकाळी अभ्यास केल्याने संपूर्ण दिवसही चांगला जातो. सकाळच्या वातावरणात उठल्याने दिवसभर मन प्रसन्न राहते.
- सकाळी सकाळी अभ्यासाने सुुरूवात केल्याने आपल्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करता येते. त्यामुळे वेळेचे व्यवस्थित नियोजन होते.