Surabhi Jayashree Jagdish
भारत अनेक ऐतिहासिक किल्ले, राजवाडे आणि स्मारकांनी समृद्ध आहे.
हे ऐतिहासिक किल्ले देशाच्या समृद्ध सांस्कृतिक गोष्टीचं आणि इतिहासाचं प्रतीक मानले जातात.
भारताचा सर्वात जुना किल्ला किल्ला मुबारक मानला जातो.
हा किल्ला पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्मारक असून त्याचा इतिहास कुषाण काळापर्यंत पोहोचतो.
असं मानलं जातं की, या किल्ल्यातच रजिया सुलतानाला कैद करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीतील विटादेखील आढळतात.
या किल्ल्यातील विटा कुषाण काळातील असल्याचे सांगितले जाते, जेव्हा सम्राट कनिष्काने उत्तर भारतावर राज्य केले होते.
हिमाचल प्रदेशातील कांगडा किल्लादेखील भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो.
असे मानले जाते की या किल्ल्याने अनेक आक्रमणं सहन केली आहेत. या किल्ल्यावरून बाणगंगा आणि मांझी नद्यांचं मोहक दृश्य दिसते.