Siddhi Hande
मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. मुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे.
वडापाव हा प्रत्येक मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
मुंबईतील सर्वात जुना वडापाव कोणता तुम्हाला माहितीये का
मुंबईतील सर्वात जुन्या वडापावपैकी एक म्हणजे आराम वडापाव.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आराम वडापाव आहे.
आराम वडापाव १९३९ पासून सुरु आहे.
आता या स्टॉलचे दुकानात रुपांतर झाले आहे.
आता आराम वडापाव स्टॉलच्या मालकांची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे.
आराम वडापाव हा खूप चविष्ट वडापाव आहे. रोज या स्टॉलबाहेर लांबच लांब रांग असते.