Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट त्वचेची काळजी घ्यावी लागते. तेलकट त्वचेवर धूळ, तेल, घाम अधिक साचतो यासाठी योग्यवेळी चेहरा धुणे महत्वाचे आहे.
तेलकट त्वचा चमकण्यासाठी तुम्ही कोणता फेसवॉश वापरला पाहिजे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
तेलकट त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एलोवेरा फेसवॉश वापरा यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते तसेच त्वचेवर सुरकुत्या येत नाही.
तेलकट त्वचेवर चारकोल फेसवॉश सर्वात बेस्ट आहे. त्वचेवर घाण, तेलकटपणा कमी करते त्वचेवर चमक आणते.
कडुलिंब त्वचेला दिर्घकाळ हायड्रेट ठेवते यामुळे त्वचेचा पोत सुधारतो त्वचेवर खाज, पुरळ येत नाही.
त्वचेवरील बारीक बारीक छिद्रे कमी करण्यासाठी तसेच तेलकट त्वचेसाठी सॅलिसिलिक अॅसिड वापरा यामुळे त्वचा स्वच्छ होते.
नियासिनमाइड हा फेसवॉश तेलकट त्वचेवर लावल्याने त्वचेवरील ओपन पोरअर्स कमी करते.
टी ट्री ऑइल हे तेलकट त्वचेवर लावल्याने फायदेशीर आहे यामुळे त्वचेवर तेल राहत नाही मुरूमे येत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.